तरोड्याच्या सुपुत्राला साश्रु नयनांनी निरोप, चार वर्षांच्या गार्गीने बाबांना दिला मुखग्नी

आर्णी तालुक्यातील तरोडा (मांगुळ) येथील शहीद जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी त्यांचे मूळगाव तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 02:46 PM IST

तरोड्याच्या सुपुत्राला साश्रु नयनांनी निरोप, चार वर्षांच्या गार्गीने बाबांना दिला मुखग्नी

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 3 मे- आर्णी तालुक्यातील तरोडा (मांगुळ) येथील शहीद जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी त्यांचे मूळगाव तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ आशिष रहाटे आणि चार वर्षीच्या गार्गीने मुखग्नी दिला.  यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. आपल्या लाडक्या वीरपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता.

तरोडा गावातून शहीद अग्रमन रहाटे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नंतर अग्रमन रहाटे त्यांच्या पार्थिवावर घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई निर्मला, पत्नी रेश्मा, मुलगी गार्गी, आरुषी, बहीन सुकेशना डांगे, लीना खोब्रागडे यांनी अंत्यदर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री मदन येरावर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार श्रीकांत निळ, पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कार करते वेळी हजारो नागरिकांनी 'भारत माता की जय', 'अग्रमन रहाटे अमर रहे', 'वंदे मातरम', अशा घोषणा देत आपल्या लाडक्या सुपुत्राचा सश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.


Loading...

VIDEO: शहीद जवान तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...