07 जुलै : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये भररस्त्यावर एकावर अंत्यसंस्कार केल्याची खळबळजनक घटना घडलीये.
आयटी हब म्हणून हिंजवडी फेज 3 मध्ये हा प्रकार घडलाय. 33 वर्षीय गवारवाडीत राहणाऱ्या परमेश्वर गवारे यांच्या आज दुपारी भररस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार उरकून घेतले. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले आहे तिथे यापूर्वी स्मशानभूमी होती. मात्र, सरकारने जागा हस्तांतरीत केल्यानंतर इथं शेकडो घरांची सोसायटी उभारण्यात आली. तिथून काही अंतरावर गावकऱ्यांना स्मशानभूमीसाठी जागाही देण्यात आली. पण तेथील नागरिकांनी याला विरोध केला. त्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करावे असा पेच प्रसंग निर्माण झाला.
गेल्या दहा वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. याच ठिकाणी आतापर्यंत 40 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती पुढे आलीये.
त्यामुळे आता तरी लवकर स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गवारवाडीच्या गावकऱ्यांनी केलीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा