Elec-widget

आपल्या शहीद बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आली 3 महिन्यांची चिमुकली

शहीद प्रकाश जाधव यांच्यावर बेळगावमध्ये अंत्यसंस्कार

  • Share this:

दहशतवाद्यांच्या चकमकीत बेगळावचे जवान प्रकाश जाधव हे शहीद झाले आहेत. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

सगळ्यात गंभीर म्हणजे प्रकाश जाधव यांना 3 महिन्यांची मुलगी आहे. या चिमुकलीचे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथील सीमारेषेवर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. पण यावेळी बेळगाव जिल्ह्यातील बुदिहाळ गावचे जवान प्रकाश जाधव हुतात्मे झाले.

Loading...

हुतात्मा जाधव यांच्यावर आज बेळगाव जिल्ह्यातील बुदिहाळ या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन तासांच्या अंत्ययात्रानंतर प्रकाश जाधव यांना लष्करी इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात तीन महिन्याची मुलगी, पत्नी आणि परिवार आहे. शहीद जवान जाधव यांना तीन महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. दिवाळीच्या सणासाठी ते घरी आले होते. त्यावेळी मुलीला बघून ते परत ड्युटीवर परत गेले होते.

आता प्रकाश हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या 3 महिनाच्या मुलीसमोर अंत्यसंस्कार करताना सारेच गहिवरले होते.

रेडवानी पुलगाममध्ये राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना काही दिवसांपूर्वी वीरमरण आलं. प्रकाश जाधव हे निपाणी तालुक्यातील बुधीहाळ गावचे होते.

जाधव यांच्या जाण्याने बुधीहाळ गावावर शोककळा पसरली आहे. 28 वर्षीय प्रकाश जाधव दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. जाधव मराठा लाइट इंफंट्रीचे जवान आहेत.

दीड वर्षांपूर्वी जाधव यांचा विवाह झाला होता. प्रकाश यांच्या जाण्यामुळे त्यांची 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी झाली आहे.

शहीद जाधव यांच्यावर बुधीहाळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवानदेखील यात किरकोळ झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलांना माहिती मिळाली की, दहशतवादी दक्षिणी कश्मीरमध्ये कुलगाम सेक्टरमध्ये लपून बसले आहेत. त्यानंतर या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी जाधव यांना वीरमरण आलं.

संशयित परिसरात भारतीय सैन्याने घेरा घातला. त्यामुळे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. त्यात राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2018 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...