धर्मा पाटील यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार

धूळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर त्यांच्या विखरण या मुळगावी शोकपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2018 04:31 PM IST

धर्मा पाटील यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार

धुळे, 30 जानेवारी : संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयात विषारी औषध घेऊन आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर त्यांच्या विखरण या मुळगावी शोकपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण विखरण गावातील गावकऱ्यांसह सर्वपक्षीय नेते या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

यावेळी राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

शासनाकडून, योग्य दाद मिळत नसल्यानं हतबल झालेले धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज संपूर्ण विखरण गावसह परिसर शोकसागरात बुडाला होता.

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर अनेक राजकीय पडसाद उमटले. आता हार्दिक पटेल यांनीही धर्मा पाटील यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचं ट्विट केलं आहे. धर्मा पाटील यांच्या निधनावर हार्दिक पटेल यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, '८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही फारच ह्रदयद्रावक घटना असून यास पूर्णतः सरकार जबाबदार आहे.'

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...