परभणीत सेलू तहसील कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार

स्थानिक गावकऱ्यांनी संतप्त भूमिका घेऊन चक्क सेलू तहसील कार्यालयातच अंत्यसंस्कार केले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2017 05:20 PM IST

परभणीत सेलू तहसील कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार

पंकज क्षीरसागर, परभणी

19 जुलै : परभणीच्या सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या पुनर्वासितांचा प्रश्न गंभीर बनलाय पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्ष लोटली मात्र सुविधाच नाहीत. आज तर गावातील मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने स्थानिक गावकऱ्यांनी संतप्त भूमिका घेऊन चक्क सेलू तहसील कार्यालयातच अंत्यसंस्कार केले. त्यामुळे सेलूत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही स्मशानभूमी नाहीये..पण समोर जे जळतंय ते खरोखरच सरण आहे. आणि समोरची इमारत आहे सेलू तहसीलदार कार्यालयाची.. परभणी जिल्ह्यातल्या सेलूजवळ लोअर दुधना प्रकल्पग्रस्तांचं दहा वर्षांपूर्वी पुनर्वसन केलं. पण पुनर्वसीत लोकांना अजून हक्काची स्मशानभूमी मिळालेली नाही. पुनर्वसीत वस्त्यांमध्ये जगण्यासाठी सोईसुविधा नाहीत. आणि मरणानंतर जळून राख होण्यासाठी स्मशानभूमीही नाही. त्यामुळेच देवलातील गावकऱ्यांनी नातेवाईकाचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. पण अधिकाऱ्यांना त्याचीही दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोरचं नातेवाईकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

वस्त्यांमधील राहणाऱ्या लोकांना सध्या रस्ते, पाणी, गटारं अशा सुविधाही दिलेल्या नाहीत. त्यामुळेच जगण्यानं छळलं होतं आणि मरणानंही सुटका केली नाही असं खेदानं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...