महाराष्ट्र बंदमुळे झालेली नुकसान भरपाई सरकार कोणाकडून वसूल करणार?

महाराष्ट्र बंदच्या दरम्यान आंदोलकांनी ठिक-ठिकाणी तोडफोडी केल्या अनेक वस्तूंचं नुकसान झालं. यात झालेल्या नुकसानीची भरपाई बंद घोषित करणाऱ्यांकडून घेतली जाणार का याबाबत आता चर्चा सुरु आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2018 11:53 AM IST

महाराष्ट्र बंदमुळे झालेली नुकसान भरपाई सरकार कोणाकडून वसूल करणार?

04 जानेवारी : भीमा कोरेगाव येथून अभिवादन करून परतत असताना झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र बंद होता. महाराष्ट्र बंदच्या दरम्यान आंदोलकांनी ठिक-ठिकाणी तोडफोडी केल्या अनेक वस्तूंचं नुकसान झालं. यात झालेल्या नुकसानीची भरपाई बंद घोषित करणाऱ्यांकडून घेतली जाणार का याबाबत आता चर्चा सुरु आहे. बंद दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान आयोजकांकडून घेण्याबाबतचा कायदा आहे. हा कायदा यावेळी आयोजकांना सरकार लावणार का याबाबत सरकार आज काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

काल झालेल्या बंदमध्ये महाराष्ट्रभर आंदोलकांची आंदोलनं आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यात जागोजागी गाड्या फोडण्यात आल्या. बसेस फोडल्या गेल्या. दुकानं फोडण्यात आली. रेल्वे स्थानकांत रेल रोको करण्यात आला बरं इतकंच नाही तर स्थानकांवरचे बाकही उचलून रुळावर टाकण्याचे प्रकार काल आंदोलकांकडून करण्यात आले. यात अनेकांच्या खासगी गाड्याही फोडण्यात आला. त्यामुळे कालच्या बंदमुळे अनेकांचं नुकसान झालं.

राज्यभरात झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा एकत्रित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सध्या सुरु आहे. आयोजकांनी नुकसान भरपाई देण्याचे सरकारचे आदेश आल्यास योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असं सांगत याबाबत तयारी असल्याचं आधीच प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close