प्रकाश आंबेडकर नेमके कुठून लढणार ?

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांचं नाव नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकी कुठून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 05:00 PM IST

प्रकाश आंबेडकर नेमके कुठून लढणार ?

मुंबई, 15 मार्च : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांचं नाव नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकी कुठून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

काँग्रेसशी फारकत घेत वंचित बहुजन आघाडीने सर्व 48 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.आपण सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवू, असं त्यांनी म्हटलं होतं. पण सोलापूर की अकोला या मतदारसंघांपैकी कुठून लढणार हे त्यांनी जाहीर केलेलं नाही.

वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. या यादीत बारामती, माढा, मावळ याही मतदारसंघांचा समावेश आहे. पहिल्या यादीतले हे उमेदवार धनगर, कुणबी, मुस्लीम, भिल्ल अशा समाजातले आहेत. या सगळ्या समुदायांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यांना इथून काँग्रेसनेच अनेक वेळा पाडलं होतं. पण 1999 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे जे 4 खासदार निवडून गेले त्यात मात्र त्यांचा समावेश होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षातल्या सगळ्या गटांनी काँग्रेसशी युती केली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर अकोल्यासोबतच सोलापूर मतदारसंघाचाही पर्याय आहे. सोलापूरमध्ये झालेल्या त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.

Loading...

त्यांनी सोलापूरमधून लढण्याचं घोषित केल्यानंतर, सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी निर्माण झाली. आंबेडकरांनी शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली तर तिथे काँग्रेसचं मोठं नुकसान होऊ शकतं.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत MIMचा समावेश आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लीम मतांची मोट बांधत ते काँग्रेसची मतं आपल्याकडे खेचू शकतात. त्यांच्या या राजकीय खेळीचा फायदा युतीला होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

=================================================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...