S M L

आजपासून बळीराजाच्या संपाचा पुन्हा एल्गार

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2018 09:07 AM IST

आजपासून बळीराजाच्या संपाचा पुन्हा एल्गार

01 जून : आजपासून राज्यातल्या बळीराजा पुन्हा संपावर जाणार आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे, अशी माहिती जनआंदोलनाचे अॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील २२ राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना आजपासून भाजीपाला, दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

कुक्कुटपालन, ठिबक सिंचन, ग्रीन हाउस या पूरक व्यवसायांसह शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभावावर आधारित कायद्याने बाजारभावाची हमी द्यावी, शेतकऱ्याला पत्नीसह निवृत्तीवेतन देण्यासाठी, तसेच दुधाला किमान ५० रुपये हमीभावासाठी कायदे करण्यात यावे, शेती उत्पन्नातील जोखमीचा (इर्मा) कायदा करून राज्यात राबवावा, बैलगाडा शर्यतीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी, या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या. हे आंदोलन शांततामय मार्गाने केले जाणार असून शेतकरी हाच आंदोलनाचा नेता आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात आल्याची माहिती अॅड. सावंत यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 09:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close