व्यापाऱ्यांच्या तिजोरीवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 238 कोटींचा अपहार उघड

व्यापाऱ्यांच्या तिजोरीवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 238 कोटींचा अपहार उघड

बँकेचे संचालक अलबेल असल्याच सांगत असले तरीही त्यांना पोलीस तसच सहकार खात्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला आणि न्यायालयीन लढाईला आता तोंड द्यावं लागणार आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 25 जुलै : पिंपरी चिंचवड मधील नामांकित  'दि सेवा विकास सहकारी बँके'मध्ये सुमारे 238 कोटींचा अपहार झाल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी बॅँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने व्यापारी आणि बँकिंग क्षेत्राला धक्का बसलाय. तर या प्रकारामुळे बँकेची विश्वसनियताच धोक्यात आलीय. गेली काही वर्ष सातत्याने असे घोटाळे उघडकीस येत असल्याने आता पैसे ठेवायचे तरी कुठे असा सवाल व्यापाऱ्यांनी केलाय.

..तर पक्षावर ही वेळ आली नसती, NCPच्या माजी प्रदेशाध्यक्षांची सणसणीत चपराक

'दि सेवा विकास सहकारी बँक' ही पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांची तिजोरी मानली जाते. मात्र आता या बँकेत ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी सुरक्षित राहतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण या बँकेचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी तब्बल 238 कोटींचा अपहार केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास केला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी दिलीय. बँकेचे माजी संचालक आणि ठेवीदार असलेल्या धनराज असवानी यांनी  घोटाळा झाल्या प्रकरणी तक्रार दाखल करत हा प्रकार उघडीस आणालाय.

पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत केली 64 कोटींची उधळपट्टी

प्रामाणिक आणि दक्ष अधिकारी म्हणून ज्यांची सहकार खात्यात ओळख आहे असे सहनिबंधक राजेश जाधववार यांनीही आपल्या लेखा परीक्षण अहवालात बॅँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात अनेक अनियमितता असल्याचं नमूद केलं होतं. तसच कोट्यवधींचा अपहार झाल्याचंही अहवालात म्हटलं होतं. मात्र बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदाणी ह्यांनी सर्व आरोप फेटाळात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

मात्र अमर मूलचंदाणी जरी सर्व अलबेल असल्याच सांगत असले तरीही त्यांना पोलीस तसच सहकार खात्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला आणि न्यायालयीन लढाईला आता तोंड द्यावं लागणार आहे. मात्र तोपर्यंत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत राहणार का असा सवाल खातेदारांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bank fraud
First Published: Jul 25, 2019 05:39 PM IST

ताज्या बातम्या