S M L

राज्यसभेसाठी भाजपकडून नारायण राणेंसह चार संभाव्य नावं जाहीर

तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि श्याम जाजू यांची नावं पुढे येत आहे. जावडेकर तर सध्याही खासदार आहेत.

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2018 06:47 PM IST

राज्यसभेसाठी भाजपकडून नारायण राणेंसह चार संभाव्य नावं जाहीर

01 मार्च : राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. भाजपकडून चार संभाव्य नाव समोर आली आहे. यात नारायण राणे यांच्यासह मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि श्याम जाजू यांची नावं पुढे आली आहे.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात महाराष्ट्र मधील 6 जागांचा समावेश आहे. राज्यसभेतील कार्यकाळ संपत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे.  संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

येत्या २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ४ संभाव्य नावं समोर आली आहेत. देशाचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची पुन्हा वर्णी लागणार आहे. तर नारायण राणे यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे.   तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि श्याम जाजू यांची नावं पुढे येत आहे. जावडेकर तर सध्याही खासदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close