अंगणात खेळत असलेल्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला; चार जणांनाही केले जखमी

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका अडीच वर्षीय मुलाचा समावेश आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारीही जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 06:06 PM IST

अंगणात खेळत असलेल्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला; चार जणांनाही केले जखमी

शिर्डी, 6 जून- संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका अडीच वर्षीय मुलाचा समावेश आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारीही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बिबट्या विहिरीत पडल्याने त्याला बेशुद्ध करून वनविभागाने जेरबंद केले आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. यानंतर जवळच घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. या दोघांना रूग्णालयात दाखल करून वनविभागाला बिबट्याने केलेल्या हल्ल्याची माहिती कळवल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा शोध घेताना या बिबट्याने वनकर्मचाऱ्यावरही हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल. हल्ला केल्यानंतर बिबट्या त्याच परिसरात धुडगूस घालत होता. यावेळी तो एका झाडावर जाऊन बसला यावेळी वनविभाग त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या शेजारी असलेल्या विहिरीत पडला. वनविभागाने त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने वन्यप्राणी नागरी वस्तीत येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.

चंद्रपुरात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचे बिबट्याने तोडले लचके

बिबट्याच्या हल्ल्यात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचा मृत्यू झाला आहे. स्वराज सचिन गुरनुले असे तान्हुल्याचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात ही घटना घडली आहे. अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्याला बिबट्या पळविले. आरडाओरड आणि शोधाशोध केल्यानंतर तान्हुल्याचा मृतदेह सापडला आहे. वनपथक दाखल झाले आहेत. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी की, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्याला रात्री उशिरा बिबट्याने पळविले. अंगणाच्या पडवीत बाळासह झोपलेली आई पाणी पिण्यासाठी घरात गेल्यावर बिबट्याने हा हल्ला केला. आरडाओरड आणि शोधाशोध झाल्यावर सकाळी गावालगत चिमुकल्याचा मृतदेह सापडला. वनपथक आणि पोलीस गावात दाखल झाले आहेत. मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या गावात प्रचंड तणावाची स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...