Elec-widget

संघाच्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

संघाच्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

ष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे. त्यासाठी प्रणव मुखर्जी नागपूरात दाखल झाले आहेत.

  • Share this:

नागपूर, ता. 06 जून : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आज नागपूरात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे. त्यासाठी प्रणव मुखर्जी नागपूरात दाखल झाले आहेत.

विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी संघाचे सहसरकार्यवाह व्ही भागय्या आणि महानगर संघचालक राजेश लोया आले होते. उद्याच्या कार्यक्रमासाठी त्या मुक्काम राजभवनात असणार आहे. 7 जूनला होणाऱ्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 6 वाजता ते रेशिमबागेत जातील. तिथे ते जवळपास साडेतीन तास थांबणार आहेत.

दरम्यान, उद्याच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्षं लागलंय. काँग्रेसच्या आणि डाव्यांच्या विरोधानंतरही प्रणव मुखर्जी हे संघस्थानी जाणार आहेत, हे खरंतर गेल्या आठवड्यातच स्पष्ट झालंय. या वादावर मला काय बोलायचं ते मी संघस्थानीच बोलेन, अशी दृढ प्रतिक्रिया त्यांनी यापू्वीच दिलीय.

संघस्थानावरून त्यांनी नेमकं काय बोलावं हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे, तरीही त्यांच्या नियोजित भाषणाबद्दल आतापासूनच अनेक नाना तर्क वितर्क लावले जाताहेत. काँग्रेसवाले म्हणताहेत की. ते संघाला त्यांच्याच व्यासपीठावरून खडे बोल सुनावतील तर भाजप आणि संघवाल्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, या विषयी स्पष्ट काही अद्याप समोर आलेलं नाही.

भिन्न विचारसरणीच्या मान्यवरांनी संघस्थानी जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, तृतीयवर्षीय दीक्षा समारोपाला जाणीवपूर्वकपणे संघ परिवाराबाहेरचाच वक्ता बोलावला जातो. यावेळीही संघाने प्रवण मुखर्जींना बोलावून ही परंपरा कायम ठेवलीय. या निमंत्रणाबद्दल काँग्रेस गोटातून तिखट प्रतिक्रिया आल्यावरही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  सुशीलकुमार शिंदेंनी मात्र, आवर्जून या उपक्रमाचं स्वागत केलंय.

Loading...

प्रणव मुखर्जी हे कट्टर संघविरोधक मानले जात असले तरी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुखर्जी यांच्यातला स्नेह सर्वश्रूत आहे. उभयतांमध्ये आतापर्यंत 4 भेटी झाल्यात. यातल्या दोन भेटी तर मुखर्जी राष्ट्रपती असताना झाल्यात. त्यामुळे संघाच्या या तृतीयवर्ष समारोप प्रसंगी प्रणवदा नेमकं काय बोलणार ह्याची प्रचंड उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...