माजी राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारच्या राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित

देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा 'ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला' हा राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 06:22 PM IST

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारच्या राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित

पुणे, 1 जून- देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा 'ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला' हा राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. मेक्सिकोच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांच्‍या हस्‍ते प्रतिभा पाटील यांना सन्‍मानपूर्वक हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

पुण्यातील सेनापती बापट रस्‍त्‍यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजच्‍या पाचव्‍या मजल्‍यावरील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां.ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्‍योती राठोड, मोहन जोशी, उल्‍हास पवार, शरद रणपिसे, डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्‍हाधिकारी अमृत नाटेकर हे उपस्थित होते.

श्रीमती पाटील म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रपतिपदी असताना मेक्सिको आणि भारत देशामध्‍ये विविध क्षेत्रातील परस्‍पर सामंजस्‍य करार करण्‍यात आले होते. दोन्‍ही देशांमध्‍ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्‍यावर भर देण्‍यात आला होता. हे सर्व करत असताना मी देशाचे प्रतिनिधित्‍व केले. त्‍यामुळे हा पुरस्‍कार म्‍हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्‍ही देशांच्‍या मैत्रीचा गौरव आहे. देशाच्‍या राष्‍ट्रपतीपदी असतांना सन 2007 मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्‍यानंतर मी 2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते, अशी आठवण श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितली.

श्रीमती प्रतिभाताई त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्याच्या वेळी देशातील उच्चत्तम व्यापारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज (फीक्‍की), अॅसोचॅम, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्‍ट्री (सीआयआय) यांचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ बरोबर नेत असत, ते त्यांच्याच खर्चाने यायचे व त्यामुळे भारताचे दुसऱ्या देशांशी व्यापारी संबंध वाढले व ते फायद्याचे ठरले असे या उच्चतम व्यापारी संघटनांनी पुस्तिका प्रकाशित करून सांगितले.

मेक्सिकोच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांनी या राष्‍ट्रीय पुरस्‍कारामागची भावना व्‍यक्‍त केली. त्‍या म्‍हणाल्‍या, मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्‍यात येतो. असा पुरस्‍कार मिळवणा-या श्रीमती पाटील या पहिल्‍या भारतीय महिला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले असल्‍याचाही त्‍यांनी उल्‍लेख केला.

Loading...

कार्यक्रमात माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांच्‍या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी तसेच त्यांच्‍या मेक्सिको भेटीवरील व्हिडीओ चित्रफीत दाखवण्‍यात आली. श्रीमती मेल्‍बा प्रिया यांचे स्‍वागत ज्‍योती राठोड यांनी तर डॉ. देविसिंह शेखावत यांचे स्‍वागत डॉ. जसवंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा शहा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते.


SPECIAL REPORT: मोदींची फटकेबाजी, पान खाऊन पिंक टाकणाऱ्यांवर लगाम कोण लावणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2019 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...