चंद्रकांत खैरेंविरुद्ध इम्तियाज जलील.. बछड्यांच्या बारशावरून यांच्यात पेटला नवा वाद

बछड्यांच्या बारशावरून मानापमानाचे नाट्य रंगले आहे. माजी चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 01:55 PM IST

चंद्रकांत खैरेंविरुद्ध इम्तियाज जलील.. बछड्यांच्या बारशावरून यांच्यात पेटला नवा वाद

औरंगाबाद, 8 जून- शहरातील सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दिलेल्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने पार पडला. 26 एप्रिल रोजी जन्मलेल्या नर बछड्याचे नाव कुश आणि तीन मादी बचड्यांची नावे अर्पिता, देविका आणि प्रगती अशी ठेवण्यात आली आहे. बरश्याचा कार्यक्रम अर्पिता, देविका, प्रगती आणि कुश अशी बछड्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. यासाठी नागरिकांना बछड्यांसाठी नावं सुचवण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल अडीच हजार नावे सुचवली होती. यातूनच या बछड्यांची नावे निवडण्यात आली आहेत. मात्र, बछड्यांच्या बारशावरून मानापमानाचे नाट्य रंगले आहे. माजी चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

कार्यक्रम पत्रिकेतून खासदार इम्तियाज जलील गायब...

महापालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न दिल्याने एमआयएनचे कार्यकर्त्ये आक्रमक झाली आहेत. नामकरण सोहळ्यासाठी शहरातल्या आमदारांना आमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. परंतु खासदार इम्तियाज जलील यांचा मात्र सोयीस्कर विसर पडलेला दिसला. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

काय म्हणाले महापौर?

औरंगाबादेत बछड्यांच्या नामकरण सोहळ्यावरून नवा वाद पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे शहरातील नवीन राजकीय वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कोणाला बोलवायचे, कोणाला नाही हा माझा अधिकार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले आहे. इम्तियाज जलिल यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेतील नाही, यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कार्यक्रमात कोणाला बोलवायचे, कोणाला नाही, हे याबाबत निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार मला आहे. राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) हा महापालिकेला लागू होत नाही. महापालिकेची पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार हा महापौर म्हणून पूर्णपणे माझा आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल पाळणे हे महत्त्वाचे असते ते आम्ही पाळलेले आहे. दरम्यान औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आहे. शिवसेना नेते नंदकुमार घोडेले हे महापौर आहेत. त्यामुळे बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज यांना टाळल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

Loading...


बछड्याचा वाद; खैरे विरुद्ध इम्तीयाज जलील वादाची नवी ठिणगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 01:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...