वनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर

वनविभागाचा परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आधार कार्डवरील फोटो जुळत नसल्याचे कारण दाखवून तब्बल 200 विद्यार्थ्यांना वनरक्षकाच्या परीक्षेमध्ये बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे उघडकीस आला आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 12:18 PM IST

वनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर

बीड, 15 जून- वनविभागाचा परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आधार कार्डवरील फोटो जुळत नसल्याचे कारण दाखवून तब्बल 200 विद्यार्थ्यांना वनरक्षकाच्या परीक्षेमध्ये बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांना गेटबाहेर काढण्यात आल्याने त्यांनी ठिय्या मांडला आहे.

आंबेजोगाई शहरातील टी.बी. गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेज, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन विद्यालय, तसेच आदित्य इंजिनिरिंग कॉलेजमध्ये परीक्षा सुरु आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये 15 ते 20 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन-दोन वर्षांपासून तयारी करुन देखील परीक्षा देता येत नाही म्हणून अक्षरशः काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भर्तीसाठी आणि बीडमध्ये तीन केंद्रावर ऑनलाईन परीक्षा सुरु आहे. जवळपास पाच हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दोन दिवसांत 200 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही परीक्षा ई-महापरीक्षा पोर्टल विभागाने घेतली आहे. मात्र कंपनीच्या टेक्निकल प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या मुळावर आला आहे. परीक्षा फी 500 रुपये भरून देखील फक्त आधार कार्डवरील फोटो आणि हॉल तिकिटवरील फोटो जुळत नसल्याने बाहेर काढण्यात आले. यामुळे परीक्षा विभागातिल गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. परीक्षेपासून वंचित झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासमोर गोंधळ घातला. वय वाढल्यामुळे फोटोमध्ये बदल झाल्याचे विध्यार्थ्यांनी सांगितले आहे.


SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...