प्रविण मुधोळकर, प्रतिनीधी
यवतमाळ, 20 सप्टेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जंगलातल्या 'टी-वन' या वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाने नियुक्ती केलेल्या वादग्रस्त शहाफत अली खान याला परत जाण्याचे आदेश केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे.
न्यूज18 लोकमतने हे प्रकरण उचलून धरलेले असताना, वादग्रस्त शिकारी शहाफत अली खानची माफी मागण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उपवनसंरक्षक के. एल. अभर्णा यांना रात्री शहाफतच्या हॉटेलात पाठविले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला याची चौकशी करण्यासाठी सांगितलं. त्याचा अहवाल आल्यानंतर शहाफत अली खानला तडकाफडकी परत पाठविण्यात आले आहे. शहाफतचे वागणे हे चुकीचे होते, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्य़ाच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. शहाफत अली खानच्या या कृत्याचा न्यूज 18 लोकमतने पर्दाफाश केला होता.
भर रात्री महिला अधिकाऱ्याला का पाठवलं वादग्रस्त शार्पशूटरकडे?
यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील टी वन या वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाने बोलावलेल्या वादग्रस्त शिकारी शाफत अली खानची माफी मागण्यासाठी वनविभागाने यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याला रात्री 11 वाजता त्याच्या हॉटेलच्या खोलीत भेट घेण्याचे आदेश दिले होते.
शाफत अली खान गेल्या आठवडाभऱ्यापासून पांढरकवड्याच्या जंगलात टी वन वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा शोध घेत होता. पण वनविभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल शाफत अली खानन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे नाराजी व्यक्त केल्याने, त्याची माफी मागण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के मिश्रा यांनी यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उपवनसंरक्षक के अभर्णा यांना रात्री 11 वाजता शाफत अली खान मुक्कामी असलेल्या पांढरकवड्याच्या राहुल हाटेलमध्ये पाठवलं होतं.
दरम्यान, महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे वादग्रस्त शिकाऱ्याच्या खोलीता रात्री 11 वाजता भेट घेण्यासाठी का पाठवलं त्याला ऑफिसमध्ये का बोलावण्यात आलं नाही हा मुद्दा न्यूज 18 लोकमतने उचलून धरला होता. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला याची चौकशी करण्यासाठी सांगितलं. त्याचा अहवाल आल्यानंतर शहाफत अली खानला तडकाफडकी परत पाठविण्यात आलंय. शहाफतचे वागणे हे चुकीचे होते, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्य़ाचं मनेका गांधी यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं.
कोण आहे शिकारी शाफत अली खान?
- देशभरात पाचशेहून अधिक वन्यजीवांची शिकार केल्याची त्याच्या नावावर नोंद
- 1991 -92 मध्ये माओवाद्यांना शस्त्र पुरविल्याच्या आरोपावरून शाफत अली खानला अटक
- 2005 मध्ये कर्नाटक वनविभागाच्याकडून अवैध शिकारीच्या प्रकरणात शाफत अटकेत
- बोर अभयारण्यातील वाघिणीला मारण्यासाठीही वनविभागाकडून शाफत अलीला पाचारण
- नवाब शाफत अली खान देशविदेशात वादग्रस्त शिकारी म्हणून प्रसिद्ध
- एका शिकारीसाठी नवाब शाफत अलीला वनविभागाकडून लाखोंचा मलिदा
VIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा