वनविभागाचा प्रताप, भर रात्री महिला अधिकाऱ्याला पाठवलं वादग्रस्त शार्पशूटरकडे!

कोण आहे वादग्रस्त शार्पशूटर शाफत अली खान?

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 01:55 PM IST

वनविभागाचा प्रताप, भर रात्री महिला अधिकाऱ्याला पाठवलं वादग्रस्त शार्पशूटरकडे!

प्रविण मुधोळकर, प्रतिनीधी

यवतमाळ, 19 सप्टेंबर : यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील टी वन या वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाने बोलावलेल्या वादग्रस्त शिकारी शाफत अली खानसाठी वनविभागाने आणखी एक धक्कादायक प्रताप केलाय. यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याला शाफत अली खानची माफी मागण्यासाठी रात्री 11 वाजता त्याच्या होटेलच्या खोलीत भेट घेण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शाफत अली खान गेल्या आठवडाभऱ्यापासून पांढरकवड्याच्या जंगलात टी वन वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा शोध घेताहेत पण वनविभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल शाफत अली खानन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे नाराजी व्यक्त केली. यावर माफी मागण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के मिश्रा यांनी यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उपवनसंरक्षक के अभर्णा यांना रात्री 11 वाजता शाफत अली खान मुक्कामी असलेल्या पांढरकवड्याच्या राहुल हाटेलमध्ये पाठवलं.

कोण आहे शिकारी शाफत अली खान?

- देशभरात पाचशेहून अधिक वन्यजीवांची शिकार केल्याची त्याच्या नावावर नोंद

Loading...

- 1991 -92 मध्ये माओवाद्यांना शस्त्र पुरविल्याच्या आरोपावरून शाफत अली खानला अटक

- 2005 मध्ये कर्नाटक वनविभागाच्याकडून अवैध शिकारीच्या प्रकरणात शाफत अटकेत

- बोर अभयारण्यातील वाघिणीला मारण्यासाठीही वनविभागाकडून शाफत अलीला पाचारण

- नवाब शाफत अली खान देशविदेशात वादग्रस्त शिकारी म्हणून प्रसिद्ध

- एका शिकारीसाठी नवाब शाफत अलीला वनविभागाकडून लाखोंचा मलिदा

दरम्यान, महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे वादग्रस्त शिकाऱ्याच्या खोलीता रात्री 11 वाजता भेट घेण्यासाठी का पाठवलं त्याला ऑफसमध्ये का बोलावण्यात आलं नाही असा संतप्त सवाल व्याघ्र प्रेमींनी विचारला आहे.

दरम्यान, जंगलातील टी वन या वाघिणीला वादग्रस्त शिकारी शाफत अली खानपासून वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमींनी नागपूरात मोर्चा काढला. महाराज बाग येथून मोर्चाला सुरवात झाली तर वनविभागाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी वाघाच्या वेशात येऊन आंदोलन केलं.

 

प्रेमवीर- विराट कोहलीने घातला अनुष्का शर्माचा टी-शर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2018 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...