हैदर शेख (प्रतिनिधी) चंद्रपूर, 25 जून: किटाळी गावात अस्वल आल्याची माहिती मिळाल्याबरोबर वनविभागाची शीघ्र कृती दलाची टीम घटनास्थळी पोहोचली. चिंचेच्या झाडावर चढलेल्या अस्वलामुळे दहशत पसरली होती. या अस्वलाला हुसकवून लावण्यासाठी वन विभागाला मोठे प्रयत्न करावे लागले. आगीचे पलिते घेऊन त्यांनी अस्वलाला जंगलाकडे परतवून लावलं आहे.