अंबरनाथमध्ये मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड, 30 लाखांचे विदेशी मद्य जप्त

अंबरनाथमध्ये मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड, 30 लाखांचे विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अंबरनाथमध्ये छापेमारी करून मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड केला आहे. पथकाने तब्बल 30 लाख रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, (प्रतिनिधी)

अंबरनाथ, 9 जून- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अंबरनाथमध्ये छापेमारी करून मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड केला आहे. पथकाने

तब्बल 30 लाख रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. यात मद्याने भरलेल्या 5 हजार 700 बाटल्या आणि वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे 50 हजार झाकणांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे अंबरनाथच्या बोहणोली गावातील शेतघरात सुरू होता.

मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथच्या बोहणोली येथे एका शेतघरात हा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने ही रविवारी पहाटेच्या सुमारास छापेमारी केली. यात मद्याने भरलेल्या जवळपास 5 हजार बाटल्या आणि वेगवेगळ्या ब्रँडचे 50 हजार झाकणं जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाचे निरीक्षण दीपक परब, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, दिलीप काळेल, राहुल पवार, बाळासाहेब गलांडे, संजय वाडेकर, दीपक कळंबे, विक्रम कुंभार या भरारी पथकाने ही छापेमारी केली.

गोवा राज्यातून अवघ्या 90 रुपयांत हलक्या प्रतीची दारू आणून ही दारू बारमधील रिकाम्या झालेल्या रॉयल स्टॅग, एमपीरियल ब्लु, मॅगडॉल, डीएसपी ब्लॅक ब्रँडेड मद्याच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे रिफिलिंग करण्याचे काम इथे सुरू होते. हे रिफिलिंग झाल्यावर 90 ही बाटली 600 रुपयांना पुन्हा बार आणि इतर ठिकाणी विकण्याचे या रॅकेटच्या माध्यमातून सुरू होते. सध्या या शेतघराचा मालक जगदीश लालचंद पाटील याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. हलक्या प्रतीचे मद्य सेवन केल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यामागे असलेल्या रॅकेटला लवकरात लवकर शोधून काढू, असे मुंबई उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक दीपक परब यांनी स्पष्ट केले आहे.


VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या