News18 Lokmat

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला होणार मतदान

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2018 06:09 PM IST

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला होणार मतदान

मुंबई, 01 नोव्हेंबर : धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.  तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.

धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. सहारिया यांनी सांगितलं आहे.

तर त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत.  अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव असणार आहे अशी घोषणा सहारिया यांनी केली आहे.

अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल.

त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे

Loading...

या दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असंही सहारिया यांनी सांगितलं आहे.

निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा

- नामनिर्देशनपत्रे दाखल करणे   : 13 ते 20 नोव्हेंबर 2018

- नामनिर्देशनपत्रांची छाननी       : 22 नोव्हेंबर 2018

- उमेदवारी मागे घेणे                 : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत

- निवडणूक‍ चिन्ह वाटप            : 27 नोव्हेंबर 2018

- मतदान                                  : 9 डिसेंबर 2018

- मतमोजणी                             : 10 डिसेंबर 2018

- निकालाची राजपत्रात प्रसिद्धी : 13 डिसेंबर 2018 पर्यंत

VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...