दारूच्या दुकानांसाठी महामार्गाजवळचे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात महामार्गालगत मद्यविक्रीवर बंदी आल्यानंतर महामार्ग पालिकेच्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू झाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2017 07:19 PM IST

दारूच्या दुकानांसाठी महामार्गाजवळचे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित

12 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात महामार्गालगत मद्यविक्रीवर बंदी आल्यानंतर महामार्ग पालिकेच्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू झाली. कोल्हापूर पालिकेनेही लगोलग महामार्गाजवळचे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूरमधील महामार्गालगतची 700 हून अधिक दारुची दुकानं बंद झाली आहेत. त्यामुळे यवतमाळमध्ये पालिकेने रस्ते आपल्या ताब्यात घेऊन मद्याची दुकानं सुरू झाल्यामुळे तोच फॉर्म्युला कोल्हापूरात वापरून ही मद्याची दुकानं सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

शहरातून रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. तसंच शहरातल्या अनेक भागांमधून राज्य महामार्गही गेलेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातली 150 दुकानंही आता बंद झालीयत. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितले हे रस्ते आता मनपाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कोल्हापूरमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता याला विरोध दर्शवलाय. यापूर्वी मनपानं हे रस्ते का हस्तांतरीत केले नाहीत. असा सवाल विचारत फक्त दारू दुकानदारांसाठी आता नव्यानं ही फल्डिंग लावली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.

त्यामुळे यवतमाळमध्ये आता रस्ते हस्तांतरित झाल्यावर ज्याप्रमाणे दारुची दुकानं सुरु झाली त्याप्रमाणे कोल्हापूरमध्येही दीडशे दारुची दुकानं आता पुन्हा सुरु होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...