तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा

मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज अन्नातून विषबाधा झाली. आज सकाळी या ट्रेनमध्ये 290 प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. थोड्या वेळाने काही प्रवाशांना उलट्या व्हायला लागल्या.नंतर जवळपास तीस प्रवाशांना नाश्त्यातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2017 07:06 PM IST

तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा

15 ऑक्टोबर: कोकण रेल्वेच्या तेजस एक्सप्रेसमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे 25 ते 30 जणांना ही विषबाधा झाली आहे.

मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज अन्नातून विषबाधा झाली. आज सकाळी या ट्रेनमध्ये 290 प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. थोड्या वेळाने काही प्रवाशांना उलट्या व्हायला लागल्या.नंतर जवळपास तीस प्रवाशांना नाश्त्यातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णांना तात्काळ चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीनं हलवण्यात आलं आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अन्नातून विषबाधा झाल्याची घटना लक्षात येताच तेजस एक्सप्रेस तात्काळ चिपळूण स्टेशनवर थांबवण्यात आली. अजूनही गाडी चिपळूण येथे थांबून ठेवण्यात आली आहे. दरम्यान ही विषबाधा नक्की कुठल्या पदार्थामुळे झाली हे अजूनही कळलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...