माथेरानमध्ये पाच वर्षीय मुलाचा गटारीत पडून मृत्यू, रायगडमध्ये घरे बुडाली

माथेरानमध्ये संततधार पडणाऱ्या पावसाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. माथेरानमधील जामा मशिदसमोरील गटारात पडून युवराज धीरज वालेंद्र या मुलाचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 10:43 PM IST

माथेरानमध्ये पाच वर्षीय मुलाचा गटारीत पडून मृत्यू, रायगडमध्ये घरे बुडाली

विनय म्हात्रे (प्रतिनिधी)

नवी मुंबई, 27 जुलै- माथेरानमध्ये संततधार पडणाऱ्या पावसाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. माथेरानमधील जामा मशिदसमोरील गटारात पडून युवराज धीरज वालेंद्र या मुलाचा मृत्यू झाला आहे. युवराज आणि त्याची मोठी बहीण क्लासवरून परत येताना ही घटना घडली.

युवराज आणि त्याची बहीण क्लासवरून येत असताना पाण्यात खेळत होते. खेळता-खेळता युवराज जामा मशिदसमोरील गटारात पडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. दरम्यान, युवराज हा गटारात पडल्याचे पाहताच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गटारातील मोरीत हा चिमुकला अडकून राहिल्याने त्याचा श्वास कोंडला गेला. या चिमुकल्याला गटारातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या मुलाचे वडील हात रिक्षा ओढण्याचे काम करत असून आई हॉटेलमध्ये काम करत आहे. दरम्यान या चिमुकल्याच्या मृत्यूने माथेरानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

रायगडमध्ये घरे बुडाली...

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शेलू केबिके नगरात पावसाने हाहाकार उडाला आहे. इथली घर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे चारशे कुटुंबांनी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आसरा घेतला आहे . त्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही. येथील अनेक रहिवासी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील आहेत.

Loading...

VIDEO : पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, भाजपवरही केला आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 10:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...