अकोल्याच्या एका पोलिसासह पाच पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू

अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या विठ्ठलनगरहून 14 पर्यटकांचा एक गट आज सकाळी कळंगुट समुद्रात आंघोळीसाठी उतरला होता.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 11, 2018 11:53 AM IST

अकोल्याच्या एका पोलिसासह पाच पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू

गोवा, 11 जून : अकोल्याच्या पाच पर्यटकांचा गोव्याच्या कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या विठ्ठलनगरहून 14 पर्यटकांचा एक गट आज सकाळी कळंगुट समुद्रात आंघोळीसाठी उतरला होता. खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नसल्याने त्यातले पाच जण समुद्रात ओढले गेले.

पाण्याचा प्रवाह आणि लाटा इतक्या मोठ्या होत्या की त्यांना बाहेर काढणं शक्यच झालं नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिकांच्या मदतीने त्यातल्या तीन मृतदेहांचा शोध लागला असून उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे.

मृत्यू झालेल्या तिघात दोन सख्खे भाऊ आहेत. वारंवार सुचना आणि सर्तकतेचा इशारा देऊन पाण्याच्या जवळ जाण्याचं धाडसं पर्यटक करतात आणि तिथेच त्यांच्या जीवाशी खेळ होतो.

मृत व्यक्तींची नावे

1) प्रितेश गवळी, वय 32 वर्षे,

2) चेतन  गवळी, वय 27

3) उज्जल प्रकाश वकोद, वय 25 वर्षे,

दरम्यान, खालील दोघांचे मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. स्थानिकांच्या आणि शोध पथकाच्या मदतीने शोधकार्य अद्याप सुरू आहे.

4) किरण ओमप्रकाश म्हस्के आणि

5) शुभम गजानन वैद्य

हेही वाचा...

नागपूरमध्ये भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या

VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...

VIDEO मुंबई-गोवा महामार्गावरून जातान सावधान ! रस्त्याला पडलंय मोठं भगदाड

माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान

'लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, सीएम-पीएमच्या सुरक्षेत वाढ करा' सामनातून शिवसेनेची खोचक टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2018 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close