मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर 5 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

नागपुरात मुख्यमंत्र्याच्या रामगिरी या निवासस्थानासमोर हा प्रयत्न करण्यात आला. आत्महत्येचा प्रयत्न करणारे नागपूर महापालिकेचे बडतर्फ अधिकारी आहेत

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2018 06:50 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर 5 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

नागपूर, 11 फेब्रुवारी:   मंत्रालयात दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानात आज 5 जणांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी धाव घेतल्यामुळं मोठा अनर्थ टळला.

नागपुरात मुख्यमंत्र्याच्या रामगिरी या निवासस्थानासमोर हा प्रयत्न करण्यात आला.  आत्महत्येचा प्रयत्न करणारे नागपूर महापालिकेचे बडतर्फ अधिकारी आहेत. 2002 मध्ये नागपूर महापालिकेनं 106 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं, त्यापैकी 17 जणांना परत कामावर घेण्यात आलं नाही. 2002 मध्ये नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.आत्महत्येचा प्रयत्न करणारे त्या 17 कर्मचाऱ्यांपैकीच असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय

नागपूर महानगरपालीकेतील १०६ कर्मचाऱ्यांना २००२ साली नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यातील ८९ कर्मचाऱ्यांना नोकरीवर परत घेण्यात आलं, पण उरलेल्या १७ जणांना अद्याप नोकरी मिळाली नाही. या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करुनंही त्यांना नोकरीवर घेण्यात आलं नाही, त्यामुळे आता त्यातील काही जणांनी नागपूरात आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कालच त्यांनी नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अशोक देवगडे,मोहम्मद युसुफ मोहम्मद याकुब, सुरेश बर्डे,विनायक पेंडके, गणपत बाराहाते आणि दीपक पोरकोडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

मंत्रालयात झालेल्या दोन आत्महत्यांमुळे सरकारवर मोठी टीका झाली. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील सात जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी सरकार काही पाऊलं उचलतं का हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...