S M L

काळजाचा थरकाप उडवणारी घटना : मुलं चोरणारी टोळी समजून पाच जणांची निर्घृण हत्या

मुलं चोरणारी टोळी समजून मारहाण करून 5 जणांची हत्या केल्याची घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यात घडली आहे. राईन पाडाच्या ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळतेय.

Renuka Dhaybar | Updated On: Jul 1, 2018 05:24 PM IST

काळजाचा थरकाप उडवणारी घटना : मुलं चोरणारी टोळी समजून पाच जणांची निर्घृण हत्या

धुळे, 01 जुलै : मुलं चोरणारी टोळी समजून मारहाण करून 5 जणांची हत्या केल्याची घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यात घडली आहे. राईन पाडाच्या ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळतेय.

गेल्या काही दिवसांत मुलं चोरल्याच्या संशयातून मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडताहेत. मात्र या संशयाच्या भुतानं धुळ्याच्या साक्रीमध्ये कहर गाठलाय. कारण या अफवांनी 5 जणांचा जीव घेतलाय.

हेही वाचा...

VIDEO : जळगावमध्ये प्रसन्न यात्रा कंपनीच्या 3 लक्झरी बसेस जळून खाक

मुंबई दर्शन करण्यासाठी आलेल्या इटालियन महिलेवर अज्ञाताकडून बलात्कार, गुन्हा दाखल

Loading...

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. मात्र ही दृश्य एवढी भयंकर आणि विदारक आहेत की ती धुसर न करता आम्ही दाखवूच शकत नाही.

संशयापोटी 5 जणांना एका खोलीत डांबून त्यांची अक्षरशः हत्या करण्यात आली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या संपूर्ण घटनेमुळं धुळ्यात दहशतीचं वातावरण आहे.

हेही वाचा...

ट्विटर युजर सुषमा स्वराज यांच्या पतीला म्हणाला, 'जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा'

रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2018 04:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close