पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण कार अपघातात 5 जण ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण कार अपघातात 5 जण ठार

रात्री दहाच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काकती जवळील वंटमुरी घाटात हा अपघात घडला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, बेळगाव

29 जून : भरधाव वेगाने जात असलेली इनोव्हा गाडीच नियंत्रण सुटल्याने डिव्हाडरला आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात 5 ठार झाल्याची घटना घडली आहे.

बेळगावहुन चिकोडीकडे जाणारी इनोव्हाचा(ka 32 n 1154) अपघात रात्री दहाच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काकती जवळील वंटमुरी घाटात हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडी इतक्या वेगात होती की पलटी झाल्याने चार जण जागीच तर एकाचा हॉस्पिटलला नेताना वाटेत मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून डीसीपी अमरनाथ रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक घटनास्थळी दाखल झाले होते.अध्याप मयतांची ओळख पटली नसून पोलीस माहिती घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 11:51 PM IST

ताज्या बातम्या