Elec-widget

बीएसएफ जवान मृत्यूप्रकरणी अखेर 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बीएसएफ जवान मृत्यूप्रकरणी अखेर 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कारंजातील बीएसएफ जवान सुनील धोपे मृत्यू प्रकरणी अखेर सीमा सुरक्षा दलाच्यया पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलय.

  • Share this:

मनोज जैसवाल, प्रतिनिधी

वाशिम, 19 सप्टेंबर : कारंजातील बीएसएफ जवान सुनील धोपे मृत्यू प्रकरणी अखेर सीमा सुरक्षा दलाच्यया पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलय. सुनील धोपेंचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यासाठी वाशिम जिल्हा बंद पुकारण्यात आला होता.

त्यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी कारंजामध्ये येऊन पीडीत कुटुंबियांची भेट घेऊन चौकशीचं आश्वासन दिलं आणि सुनील धोपेंच्या संशयादस्पद मृत्यू प्रकरणी अखेर सीमा सुरक्षा बलच्या 5 अधिकाऱ्यांवर कारंजा पोलिसात कलम 302 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील कारंजा लाड इथले रहिवासी बीएसएफ जवान सुनील धोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. बीएसएफ म्हणण्यानुसार त्यांनी आत्महत्या केली होती पण कुटुंबीयांना ते पटत नव्हतं. कुटुंबीयांच्या मते, त्यांचा घातपात झाला आहे, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि धोपेंना शहिदाचा दर्जा द्या, अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती.

संबंधीत संशयीतांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत बीएसएफ जवान सुनील धोपेंचे अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबियांकडून करण्यात आली होती त्यामुळे धोपे यांचं पार्थिव अजूनही अमरावतीत शीतगृहामध्ये ठेवण्यात आलं आहे. पण दरम्यान आता या 5 जणांच्या अटकेनंतर अखेर धोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची शक्यता आहे.

Loading...

 

या सहा गोष्टी दूर करतील पैशांची तंगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...