सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार पाच दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार पाच दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल. 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल. म्हणजे आधी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुटी आता प्रत्येक शनिवारी असेल. 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक

राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सरकारने हा निर्णय घेतला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रलंबित मागण्या होत्या. या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आढावा घेतला.

BMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महाभाई भत्त्यामध्येही वाढ करण्यात येणार आहे. मूळ वेतनावर आता 9 टक्क्यांवरून 12 टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येईल.

7 लाख कर्मचाऱ्यांना लाभ

1 जानेवारी 2019 पासून थकबाकीसह महाभाई भत्ता वाढीची रक्कम मिळेल. सुमारे 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकांआधी ही आश्वासनं देण्यात आली आहेत. आता या आश्वासनांची पूर्तता व्हावी हीच सगळ्या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.

================================================================================================================

SPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 09:40 PM IST

ताज्या बातम्या