News18 Lokmat

इंद्रायणीतल्या हजारो मृत माशांवर निसर्गप्रेमींनी केले अंत्यसंस्कार

फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेकडून इंद्रायणी नदी पात्रातील मृत्यू पावलेल्या माशांना एकत्रित करण्यात आलं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी देहुकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 10:24 PM IST

इंद्रायणीतल्या हजारो मृत माशांवर निसर्गप्रेमींनी केले अंत्यसंस्कार

अनिस शेख देहू  9 जून :  इंद्रायणी नदी पात्रात आज दूषित पाण्यामुळे  हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली होती. मृत मासे पाण्यावर तरंगू लागल्याने घटना उघडकीस आली. या घटनेने सर्व देहूमध्ये एकच खळबळ उडाली. तर निसर्गप्रेमी नागरिकांनी दु:ख व्यक्त केलं.

इंद्रायणीला महाराष्ट्रात एक वेगळं स्थान आहे. देहू, आळंदी, पंढरपूर या संतांच्या गावांमधून ही नदी जात असल्याने या नदीचं अध्यात्मिक महत्त्वही जास्त आहे. त्यामुळे या घटनेनेनं सगळ्यांच्या मनात दु:खाची किनार उमटली.

फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेकडून इंद्रायणी नदी पात्रातील मृत्यू पावलेल्या माशांना एकत्रित करण्यात आलं. सकाळी आठ वाजल्यापासून या कामाला सुरुवात करण्यात आली सायंकाळी सात वाजेपर्यंत या संस्थेकडून जवळपास आठ हजार मृत मासे गोळा करण्यात आले सांयकाळी 8 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या तिरावर हिंदू संस्कृती प्रमाणे सर्व मृत माशानां एकत्रित करून पाणवलेल्या डाळ्यानी माशांना देहु ग्रामस्थाकंडून मुखाग्नी देण्यात आला.

एकाच दिवसात एवढे मासे मृत झाल्याने देहुपरीसरातील ग्रामस्थानी हळहळ व्यक्त करत देव मांशाना अखेरचा निरोप दिला. प्रदुषणामुळे इंद्रायणीची अवस्था सध्या गटारगंगा अशी झाली आहे. या नदीची तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2019 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...