शिर्डी विमानतळाची चाचणी यशस्वी

शिर्डीमधल्या श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचं यशस्वी लॅन्डिंग झालंय. येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबई ते शिर्डी अशी नियमित विमानसेवा सुरू होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 05:22 PM IST

शिर्डी विमानतळाची चाचणी यशस्वी

शिर्डी, 26 सप्टेंबर : शिर्डीमधल्या श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचं यशस्वी लॅन्डिंग झालंय. 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होणार आहे. त्याआधी आज विमानतळाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आज या पहिल्यावहिल्या विमानानं शिर्डीच्या विमानतळावर दाखल झाले. येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबई ते शिर्डी अशी नियमित विमानसेवा सुरू होणार आहे.

काय आहेत या विमानतळाची वैशिष्ट्य?

  •  शिर्डीपासून 15 किमी अंतरावर काकडी गावात विमानतळ
  • 300 कोटी रुपये खर्चून विमानतळ बांधलं
  • Loading...

  • साई संस्थानकडून विमानतळाला 50 कोटी रुपये
  • विमानतळावरून सुरुवातीला दररोज 500 प्रवासी ये-जा करण्याचा अंदाज
  • मुंबई-शिर्डी हे अंतर विमानानं 35 मिनिटांत गाठता येणार
  • अलायन्स एअरलाइन्स, जेट एअरवेज, इंडिगोची विमानसेवेची तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...