आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेचा साईदर्शनाने पहिला टप्पा पूर्ण

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशिर्वाद यात्रे'च्या पहिल्या टप्पा शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाने पूर्ण झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 08:45 PM IST

आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेचा साईदर्शनाने पहिला टप्पा पूर्ण

मुंबई, 22 जुलै- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशिर्वाद यात्रे'च्या पहिल्या टप्पा शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाने पूर्ण झाला. ही राजकीय यात्रा नसल्याचे सांगत पुढील सरकारही भगवे असणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रेला सुरूवात केली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पाचोरा ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या यात्रेची आज शिर्डीत साईदर्शनाने सांगता झाली आहे.

पहिल्या टप्प्यात जनतेने भरभरून प्रेम दिले, असे सांगत ही राजकीय यात्रा नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. युतीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून धुसफुस सुरू आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा भाजप करताना दिसत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी साईमंदिरात राजकीय विषयावर बोलणे टाळले.

आदित्य ठाकरेंनी केला 1800 किलोमीटरचा प्रवास

जन आशिर्वाद यात्रेत जळगाव, धुळे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील तालुके, महत्वाची गावे, बाजार समित्या, शाळा-कॉलेज तसेच सामाजिक संस्था आणि धार्मिक स्थळे या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. 'जन आशिर्वाद यात्रा' पहिल्या टप्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 1800 किलोमीटरचा प्रवास केला तर 21 सभा घेतल्या. या यशस्वी पहिल्या टप्प्यानंतर आता 'जन आशिर्वाद यात्रा' चा दुसरा टप्पा कुठे करणार याबद्दल शिवसैनिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर विरोधकही आदित्य ठाकरे यांच्या मार्गावर लक्ष ठेऊन आहेत.

VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...