नागपूर,13सप्टेंबर: मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी फिरोज खानला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं आहे.याआधीही अनेक दहशतवाद्यांना या जेलमध्ये हलवल्यामुळे या जेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फिरोजला सध्या फाशी यार्डातील कोठडीत ठेवण्यात आलं आहे.२४ वर्षांपूर्वी फिरोज आणि त्याचे साथीदार बॉंम्बस्फोटानंतर फरार झाले होते. नंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. फिरोजचे साथीदार अजगर मुकादम आणि अब्दुल गनी तुर्क हे दोघे नागपूरच्याच कारागृहात आहेत. आता २४ वर्षानंतर या कुख्यात दहशतवाद्यांची जेलमध्ये भेट झाली आहे. सोमवारीच आयुष पुगलिया या कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोषीचा जेलमध्येच खून करण्यात आला होता.
देशभरातील अनेक कुख्यात दहशतवादी नागपूर सेंट्रल जेल मध्ये हलवण्यात आल्याने जेलची सुरक्षा वाढवण्याची मागणी होते आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा