सोलापुरात काळविटाच्या कळपावर अज्ञातांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

मोडनिंब-अरण येथील टोणपे वस्तीवर भरदिवसा गोळ्या घालून एका काळवीटाची शिकार करण्यात आलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 11:58 PM IST

सोलापुरात काळविटाच्या कळपावर अज्ञातांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

सोलापूर, 18 जुलै : मोडनिंब-अरण येथील टोणपे वस्तीवर भरदिवसा गोळ्या घालून एका काळवीटाची शिकार करण्यात आलीय.

मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अरण-भेंड शिवेवर असलेल्या टोणपे वस्तीवर मोठ्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांना तवेरा गाडी पंधरा ते वीस काळवीटांच्या कळपामागे पाठलाग करीत आल्याचे दिसून आलं. त्यातून दोन गोळ्या या कळपातील हरणाच्या दिशेने झाडल्या गेल्या. यामध्ये गोळीबारानंतर एक नर काळविटाचा तडफडत मृत्यू पावलं.

हा प्रकार भर मनुष्य वस्तीमध्ये घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय. पडसाळी-अरण या परिसरात माळरान असल्याने नेहमी काळवीट-हरिण याठिकाणी चरत असतात.

दरम्यान, वनपाल लटके यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याचा जबाब घेतलाय. या घटनेतील मृत काळविटाचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...