PUNE: भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार, आज कडकडीत बंद

PUNE: भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार, आज कडकडीत बंद

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेत घडली.

  • Share this:

अनिस शेख, (प्रतिनिधी)

देहूरोड, 14 जून- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेत घडली. विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल असे नगरसेवकाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल कार्यालयासमोर खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. कार्यालयातील कामकाज आटोपून बाहेर पडताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. काही संशयास्पद घटना होत असल्याचे लक्षात येताच खंडेलवाल यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यामुळेच त्यांचा जीव वाचला. पळताना पडल्याने त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती वार्‍यासारखी देहूरोड शहरात पसरताच त्यांच्या पक्ष कार्यालयाजवळ शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

या घटनेच्या निषेधार्थ देहूरोड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला. मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड शहरातून निषेध रॅली तसेच मूक मोर्चा काढण्यात आला. यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सहभागी झाले होते. देहूरोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हल्ल्यासंबंधी निवेदन देण्यात आले असून आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे.

पुरंदरमध्ये शाळकरी मुलीवर 55 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर 55 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडीत येथे ही घटना घडली आहे.

कोडीत धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. गेल्या 10 जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील 13 वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.

घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- 55, रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.


VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या