News18 Lokmat

लातूर बसस्थानकात गोळीबार, हल्लेखोराने झाडलेली गोळी त्यालाच लागली

अज्ञाताने बसमधून गोळीबार केल्याने बस स्थानक परिसरात खळबळ उडाली.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 09:09 AM IST

लातूर बसस्थानकात गोळीबार, हल्लेखोराने झाडलेली गोळी त्यालाच लागली

लातूर, 26 एप्रिल : लातूरमधील बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्मच्या शेजारी थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केला. त्यानंतर या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं.

अज्ञाताने बसमधून गोळीबार केल्याने स्थानक परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री 11:30 च्या दरम्यान लातूरच्या मध्यवर्ती स्थानकावर दाखल झाली होती. चालक- वाहक हे चहा पाण्यासाठी उतरले असता अचानक बसमधून अज्ञात हल्लेखोर प्रवाशाने गोळीबार केला.

खिडकीमधून बाहेर उभ्या असणाऱ्या कोणालातरी मारण्याच्या उद्देशाने त्याने हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हल्लेखोर हा लातूरमध्ये बसला होता की कुणावर पाळत ठेवून होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...