S M L

पुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2018 05:57 PM IST

पुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण

पुणे, 19 ऑगस्ट : कोंढव्यातील लुल्लानगर चौकातल्या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आज (रविवारी) सकाळी 11 वाजता आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून त्याठिकाणी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनी 6 व्या मजल्यावर धाव घेतली आणि फ्लॅटमध्ये अडकलेल्या दोघांसह त्या मजल्यावर राहणाऱ्या अन्य  नागरिकांचे प्राण वाचले. या घटनेमुळे कोंढव्यात एकच खळबळ उडाली होती.

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन प्रचंड धूर आणि ज्वाळा निघत असल्याचे एका ऑफिस बॉयच्या लक्षात आले. त्याने लगेचच या घटनेची माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना दिली. आग लागल्याचे समजताच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आणि सर्वांनी रस्त्यावर गर्दी केली. त्यावेळी ड्युटीवर असलेले सिक्युरिटी इनचार्ज विलास पाटील आणि सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली आणि सहाव्या मजल्यावर धाव घेतली. ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती त्यातून प्रचंड धूर आणि आगिच्या ज्वाळा बाहेर येत असल्याने त्यांच्याजवळ असलेले फायर एस्टिंगविशेश निरर्थक ठरले. मात्र जीवाची तमा न बाळगता त्यांनी अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवा. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी 1.30 वाजता आग आटोक्यात आणली.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवीली जात असली तरी, एवढ्या मोठ्या इमारतीत आग विझविण्यासाठी असलेल्या अपुऱ्या आणि निरर्थक सुरक्षा साधनांबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यासाठी माणिकचंद मलबार हिलमधील नागरिकांनी आता आक्रमक पवीत्रा घेतला आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले असले तरी या घटनेचं नेमकं कारण शोधण्याची मागणी इमारतीतल्या नागरिकांनी केली आहे. ही आग जर आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 05:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close