ठाण्यात निसान शोरूमला लागली आग

ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 बंब समवेत इतर 5 टँकरच्या साहाय्याने सदरची आग विझविण्यात आली आहे. या आगीत मोठया प्रमाणावर नुकसान देखील झालं आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2017 11:22 AM IST

ठाण्यात निसान शोरूमला लागली आग

ठाणे,07 ऑक्टोबर: ठाण्यात वागळे इस्टेट परिसरातील निसान शोरूमला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली आहे. काल संध्याकाळी मुंबईतल्या बुचर आयलंडवरसुद्धा भीषण आग लागली होती.

ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 बंब समवेत इतर 5 टँकरच्या साहाय्याने सदरची आग विझविण्यात आली आहे. या आगीत मोठया प्रमाणावर नुकसान देखील झालं आहे. आता परिस्थिती आटोक्यात आली आहे अशी माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कडून देण्यात आली आहे. याही आगीत कुणाचाच मृत्यू झालेला नाही.

तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अंमृताजन ब्रिज जवळ मुंबईहून पुण्याकडे येणारी बस जळाली. खाजगी कंपनीची ही बस होती.दरम्यान सर्व प्रवासी मात्र सुखरूप आहेत. आय आर बी, डेल्टा फोर्स, आगविजवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. नंतर ही आग विझवण्यात यशही मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...