रेल्वेला आग लागली पळा! पळा!

रेल्वेला आग लागली पळा! पळा!

Tapovan express : नांदेडहून जाताना अमृतसर एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली.

  • Share this:

औरंगाबाद, सिद्धार्थ गोदाम, 06 जून : डोंगराला आग लागली पळा...पळा...असा खेळ लहानपणी सर्वजण खेळले असतील. पण, औरंगादमधील रेल्वे गाडीला आग लागल्याची बातमी वाचल्यानंतर तुम्हाला गाडीला आग लागली पळा! पळा! ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

झालं असं, नांदेडहून अमृतसरला जाणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसमध्ये रेल्वेच्या डब्यात प्रवाशाला धूर दिसला. त्यानंतर त्यानं आग आगल्याची शंका व्यक्त केली. हाहा म्हणता ही बातमी रेल्वेमध्ये वाऱ्याच्या वेगानं पसरली. प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं. एवढ्यात एकानं प्रसंगावधान दाखवत साळखी ओढली. रेल्वे देखील थांबली. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. अनेकांनी आपलं सामान गाडीबाहेर फेकून उड्या मारल्या. गार्डनं देखील गाडीची पाहणी केली. गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतर आग लागली नसल्याचं स्पष्ट झालं. पाहणीमध्ये आग लागल्याची गोष्ट अफवा असल्याचं स्पष्ट झालं. प्रवाशांची समजूत काढण्यात आली. अखेर गार्डनं काढलेल्या समजूतीला यश आलं. प्रवासी गाडीमध्ये बसले आणि गाडी औरंगाबादकडे रवाना झाली.

या घटनेदरम्यान सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. जालना – बदनापूर स्टेशनदरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे गाडीला एक तास उशिर झाला आहे.


भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपाय

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...