The Burning Train: नागपुरजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग

सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या 12437 राजधानी एक्स्प्रेसला नरखेडजवळ बुधवारी रात्री 10 वाजता अचानक भीषण आग लागली.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 09:51 AM IST

The Burning Train: नागपुरजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग

नागपूर, 13 जून- सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या 12437 राजधानी एक्स्प्रेसला नरखेडजवळ बुधवारी रात्री 10 वाजता अचानक भीषण आग लागली. नरखेड-दारीमेटादरम्यान ही घटना लागली. गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवासी थोडक्यात बचावले. वेळीच गाडी थांबवून आगवर नियंत्रण मिळविण्यात आली. त्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

मिळालेली माहिती अशी की, सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपुरवरून बुधवारी सुटली. नागपुरनंतर पुढील थांबा हा भोपाळ होता. दरम्यान नरखेड स्थानकाजवळ पावर कारमध्ये असलेल्या गार्डला धूर दिसला. त्याने तात्काळ याची माहिती पुढच्या डब्यातील गार्ड आणि पायलटला दिली. त्यानंतर ट्रेनला पांढुर्णाच्या अगोदर येणाऱ्या ढाडीमेट स्थानकाजवळ पावर ब्रेक लावून थांबवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

नरखेड ते दारीमेटा दरम्यान किलोमीटर क्रमांक 948 येथे असताना या गाडीच्या मागील एसएलआर कोचमधून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघाल्या. ही बाब गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच वॉकीटॉकीवरून लोकोपायलटला सूचना दिली. त्यानंतर लगेच ही गाडी थांबविण्यात आली. जळीत कोचला वेगळे केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.राजधानी एक्स्प्रेस तब्बल दोन तास जागेवर उभी होती, त्यामुळे त्यानंतरच्या अनेक गाड्या उशिराने धावल्या.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. काही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष गाठले. नरखेड स्टेशन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने एसएलआर कोचला वेगळे करण्यात आले. आग लागलेला कोच गाडीपासून वेगळा करण्यात आला. जवळपास दीड तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे केरळ एक्स्प्रेससह काही गाड्यांना विलंब झाला.


Loading...

सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये आग, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...