VIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान

या कंपनीच्या गोदामात असणाऱ्या होजीयरी कापडाचा कोट्यवधी रुपयांचा कच्चा व पक्का माल जळून खाक झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2018 08:43 AM IST

VIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान

भिवंडी, 19 नोव्हेंबर : भिवंडी शहराच्या जवळ असणाऱ्या 'साईनाथ होजीयरी' या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोदामात असणाऱ्या होजीयरी कापडाचा कोट्यवधी रुपयांचा कच्चा व पक्का माल जळून खाक झाला आहे. पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही .

आग लागल्यानंतर स्थानिकांनी या आगीची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली आहे.

कंपनीमध्ये कच्च्या मालाचे व पक्क्या मालाचे कापड असल्याने आगीचे लोट उंचच उंच उसळत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या कंपनीमध्ये सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. ही आग कशामुळे लागली, याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कंपनीच्या शेजारी असणाऱ्या कमलाकर कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी सावधगिरी म्हणून घराच्या बाहेर धाव घेतली. कॉम्प्लेक्सला लागूनच कंपनी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...