News18 Lokmat

अंधेरीतील रहिवासी इमारतीला आग; 1 जण जखमी

अंधेरीतील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत 1 जण जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 01:15 PM IST

अंधेरीतील रहिवासी इमारतीला आग; 1 जण जखमी

मुंबई, 05 मे : मुंबईतील अंधेरी परिसरात रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत 1 जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. अंधेरीतील यारी रोडवरील माजील मस्जिद चौकात सरीता बिल्डींगला ही आग लागली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं. शिवाय, पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मुंबईत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रहिवासी इमारतीला लागलेली आग ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी देखील मुंबईतील रहिवासी इमारतींना आग लागली आहे.Loading...

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला आग

यापूर्वी 29 एप्रिलला रात्री धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला देखील आग लागली होती. रात्री उशिरा 2.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. यावेळी तब्बल 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी एक जवान देखील जखमी झाला होता.

बीग बाजारला लागली होती आग

29 एप्रिलला मुंबईतील माटुंगा परिसरातील बिग बाजारला देखील आग लागली होती. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास बिग बाजारला आग लागली होती. अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली होती. परंतु, धुराच्या लोटामुळे आगीचा अंदाज येत नव्हता. रात्री 8 वाजता आग पुन्हा एकदा भडकली होती.


VIDEO: सत्ता आणि पैशांसाठी वाटेल त्या तडजोडी करणं दु:खदायक-अण्णा हजारे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: fire
First Published: May 5, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...