'100 Rs घ्या कांचन कुल यांना मतदान करा..' हे सांगणं उपसरपंचाला पडलं महाग

पासलकर वस्ती येथे उपसरपंच जगदाळे यांनी प्रत्येक मतदाराला 100 रूपये देऊन भाजपचे उमेदवार कांचन कुल यांना मतदान करा, असे सांगत होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 05:49 PM IST

'100 Rs घ्या कांचन कुल यांना मतदान करा..' हे सांगणं उपसरपंचाला पडलं महाग

जितेंद्र जाधव (प्रतिनिधी),

बारामती, 25 एप्रिल- भाजपचे उमेदवार कांचन कुल यांना मतदान करावे, हे सांगणे पासलकर वस्तीच्या उपसरपंचाला चांगलेच महागात पडले आहे. पैसे वाटप केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये उपसरपंच गणेश जगदाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जगदाळे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या उपसरपंच गणेश जगदाळे याचा व्हिडिओ बहुजन वंचित आघाडीचे अश्विन वाघमारे यांना प्रशासनाला व निवडणूक आयोगाला पाठविला होता. नंतर त्यांच्याविरोधात तक्रारही केली होती. जगदाळे यांच्याविरुद्ध अखेर दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पासलकर वस्ती येथे उपसरपंच जगदाळे यांनी प्रत्येक मतदाराला 100 रूपये देऊन भाजपचे उमेदवार कांचन कुल यांना मतदान करा, असे सांगत होते. या प्रकाराचा व्हिडिओ बहुजन वंचित आघाडीचे अश्विन वाघमारे यांनी निवडणुक आयोगाला पाठविला होता. त्यानुसार मतदारांना लाच देवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

सुप्रिया सुळेंविरुद्ध लढणाऱ्या कोण आहेत भाजप उमेदवार कांचन कुल?

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पराभूत करू, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडूने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांच्या उमेदवारामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत. राहुल कुल हेदेखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण 2014 साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला. रासपमधून आमदार झालेल्या राहुल कुल यांची गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली.त्यातूनच आता राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे.

बारामती मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

बारामती

दौंड

इंदापूर

पुरंदर

भोर

खडकवासला


VIDEO : शरद पवारांची नरेंद्र मोदींवर जळजळीत टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...