ठाणे नगर पोलीस स्टेशनात इक्बालसोबत दाऊद इब्राहिमवरही गुन्हा दाखल

3 कोटींच्या खंडणीचा गुन्हा ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2017 10:09 AM IST

ठाणे नगर पोलीस स्टेशनात इक्बालसोबत दाऊद इब्राहिमवरही गुन्हा दाखल

ठाणे, 04 ऑक्टोबर: मंगळवारी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला देखील आरोपी करार देण्यात आला आहे आहे. 3 कोटींच्या  खंडणीचा गुन्हा ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

उत्तर मुंबईतील एका बिल्डरकडून 3 कोटीची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा इक्बाल कासकरवर मंगळवारी दाखल करण्यात आला होता. बिल्डरने दिलेल्या माहितीनुसार  गौराई भागातील एका जमिन व्यवहारात इक्बालने त्याला धमकावून त्याच्याकडून 3 कोटी रूपयाची खंडणी वसूल केली होती. या प्रकरणी दाऊद इब्राहिमला आरोपी ठरवण्यात आलं आहे.

या आधी ठाण्यातील एका बिल्डर खंडणी वसुली प्रकरणी पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर अटक केली आहे. त्याच्या चौकशीत राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नगरसेवकांची नावं पुढे आली होती. बिल्डरला धमकावण्यात या नगरसेवकांनी इक्बाल कासकरला मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

इक्बाल कासकर प्रकरणी काल शरद पवारांनी प्रदीप शर्मा यांच्यावर टीकाही केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...