News18 Lokmat

प्राचार्याची विद्यार्थ्याशी लगट, दाखवला अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल

विद्यार्थ्यालाला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्य तसेच समुपदेशक महिलेवर पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2018 04:22 PM IST

प्राचार्याची विद्यार्थ्याशी लगट, दाखवला अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल

पुणे, ता. 17 सप्टेंबर : विद्यार्थ्यालाला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्य तसेच समुपदेशक महिलेवर पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आला आहे. या घृणास्पद प्रकामुळं पालकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्या विकृत प्राचार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.आरोपी प्राचार्य व्हिन्सेंट परेरा या विद्यार्थ्याला कॅबिनमध्ये बोलावून त्याला आपल्या व्हिडिओमध्ये अश्लील चित्रफित दाखवत असे आणि त्याच्याशी अश्लील चाळेही करीत असे.

मार्च महिन्यातली ही घटना असून त्या मुलाने शाळेच्या महिला समुपदेशकाला याबाबत सांगितलं होतं मात्र तीने कुठलीही कृती न करता उलट या विद्यार्थ्यालाच गप्प बसायला सांगितलं. या प्रकाराबद्दल शाळेकडून कुठलीही कारवाई होत नाही असं त्या घाबरलेल्या विद्यार्थ्याला लक्षात येताच त्यानं या प्रकाराबद्दल आपल्या पालकांना माहिती दिली.

मात्र अनेकांकडून आलेला दबाव आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असल्यानं पालकांनी आत्तापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नव्हती. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी पालकांना धीर दिला आणि तक्रार करण्यासाठी हिंम्मत दिली. त्यानंतर त्या पालकांनी प्राचार्य परेरा आणि महिला समुपदेशकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याने मुख्याध्यापक फरार झाला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुख्याध्यापकाची नियुक्ती बिशप थॉमस डाबरे यांनी केली असून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. न्यूज18 लोकमतने यावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी डाबरे यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता ते विदेशात असल्याची माहिती मिळाली.

दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...