पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

पाशा पटेल यांनी काल शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की सरकारमुळे शेतकऱ्यांची वाट लागली का? या प्रश्नावर पाशा पटेल भडकले. त्यांनी या पत्रकाराला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 04:18 PM IST

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

लातूर,18 सप्टेंबर: एका पत्रकाराला शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजप नेते पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल एका पत्रकाराला पटेल यांनी शिवीगाळ केली होती.

पाशा पटेल यांनी काल शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की सरकारमुळे शेतकऱ्यांची वाट लागली का? या प्रश्नावर पाशा पटेल भडकले. त्यांनी या पत्रकाराला शिवीगाळ करायला सुरुवात केली. ही शिवीगाळ कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली. याविरोधात संबंधित पत्रकाराने तक्रार नोंदवली. त्यानुसार कलम 294,504,506 भा.द.वीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विवेकानंद पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...