जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

काल मध्यरात्री ही कारवाई झालीय. आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं.

  • Share this:

गेवराई, 30 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह 28 जणांच्या विरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. बीड जिल्हा बँकेची फसवणूक करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

काल मध्यरात्री ही कारवाई झालीय. आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून कारखान्याची जमीन तारण ठेवली होती. पंरतु ही जमीन आमदार अमरसिंह पंडित यांनी बनावट कागदपत्रं तयार करून दुसऱ्याच व्यक्तीला साडेतीन लाख रूपयाला विकली. यावरून बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक एम.ए बुध्दवंत हे पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 12:01 PM IST

ताज्या बातम्या