निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 03:11 PM IST

निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार  बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

30 डिसेंबर:  अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या मालमत्तेची माहिती निवडणुक आयोगापासून लपवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती.  यामुळे आमदार कडू यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपविल्याची तक्रार चांदुर बाजार येथील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आसेगाव पोलिसात दिली.

तिरमारे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी पब्लिक रेप्रेझेन्टेटिव्ह ऍक्ट नुसार कलम 125, अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या परवानगीनुसार पोलीस पुढील चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे  आता बच्चू कडू गोत्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...