एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचावर गुन्हा दाखल

एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचावर गुन्हा दाखल

त्यांनी समाजात तेढ निर्माण केली असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. एल्गार परिषदेत कबीर कला मंचाने चिथावणीखोर भाषणे करत, दिशाभूल करणारा इतिहास मांडल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Share this:

09 जानेवारी: शनिवारवाड्यावर झालेल्या वादग्रस्त एल्गार परिषदेवर पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करत समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवलाय. याच परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर अक्षय बिक्कड या तरूणाच्या तक्रारीवरून यापूर्वी गुन्हा दाखल झालाय. रस्त्यावरती येऊन युद्ध करण्याची भाषा जिग्नेश मेवाणी आणि ओमार खलीदने केल्याचं त्या तक्रारीत म्हटलं होतं.

एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर भारतीय दंडसंहिता कलम १५६ (३) (ए) नुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बांधकाम व्यावसायिक तुषार रमेश दामगुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे, सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप व अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी समाजात तेढ निर्माण केली असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. एल्गार परिषदेत कबीर कला मंचाने चिथावणीखोर भाषणे करत, दिशाभूल करणारा इतिहास मांडल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुण्यात शनिवारवाड्यावरही एल्गार परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचारांचे अनुयायी उपस्थित होते. इथे केलेली विधानं आणि भाषण ही इतर समाजांची भावना दु:खावणारी होती असा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोणाला शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 04:24 PM IST

ताज्या बातम्या