'प्रहार'च्या जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

अकोला, 9 जून- शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

आकोट शहर पोलिसांनी 7 जून रोजी तुषार फुंडकरासह 5 ते 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वे गुन्हे दाखल केले आहेत. दर्यापूर-हिवरखेड मार्गाचे काम सुरू असताना तुषार फुंडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. अधिकाऱ्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगाने नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी दिली होती या महिलेला उमेदवारी...

यवतमाळ येथे झालेल्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना प्रहार जनशक्ती पक्षाने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विदर्भातील शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, ही भूमिका आमदार बच्चू कडू यांची होती. प्रहार जनशक्ती पक्ष लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवणार असून वैशाली येडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघातील एकमेव उमेदवार राहतील, असे आमदार कडू यांनी सांगितले होते. साहित्य संमेलनामुळे चर्चेत आलेल्या वैशाली येडे यांची उमेदवारी लक्षवेधी ठरली होती. मात्र, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या अनुभवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून वैशाली येडे यांनी केवळ 20 हजार 620 मते मिळाली. पराभवाचा सामना करावा लागला.

कोण आहेत वैशाली येडे?

- यवतमाळ येथे जानेवारी 2019 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐनवेळी उद्घाटक म्हणून वैशाली येडे यांची निवड झाली होती.

- वैशाली येडे यांच्या शेतकरी पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

- त्या सध्या कळंब तालुक्यातील राजूर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून दोन मुले आहेत.

- 'तेरवं' या नाटकात त्या मुख्य भूमिकेत आहेत.

- मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून वैशाली येडे यांनी शेतकरी विधवा महिलांचे प्रश्न, कुटुंबाच्या समस्या बिनधास्तपणे मांडल्या होत्या.

- त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहारतर्फे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती.


VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प

First published: June 9, 2019, 3:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading